Khurchi Aani Stool (The Chair and The Stool)

खुर्ची आणि स्टूल

खुर्ची म्हणाली “अरे स्टुला,

केंव्हा येणार चालायला तुला?”

स्टूल म्हणाले “त्याच वेळी

जेंव्हा हाताने वाजवशील टाळी.”

हे ऐकून पंखा हसला;

पाय नसून फिरत बसला.

Patang Gul Karanyaacha Mantra (A Spell to Make a Kite Disappear)

पतंग गुल करण्याचा मंत्र 

 

सात वेळा सात वारे, नऊ वेळा नऊ दिशा

अक्कड मिट्टी फक्कड मिट्टी, अस्वलाच्या लांब मिशा. 

तीन वेळा तीन तेरा, पाच वेळा पाच बोटे

अक्कड मिट्टी फक्कड मिट्टी, माशामाधले लांब काटे. 

सात वेळा घातला पेच, नऊ वेळा दिली हूल.

अक्कड मिट्टी फक्कड मिट्टी, तुमचा पतंग झाला गुल.

Maifal (The Concert)

मैफल 

एक झुरळ रेडिओत गेले;

गवई होऊन बाहेर आले.

एक उंदीर तबल्यात दडला;

तबलजी होऊन बाहेर आला. 

त्या दोघांचे गाणे झाले;

तिकीट काढून मांजर आले.